लोणच्यासाठी आठवडे बाजारात गावरान कैरीला ग्राहकांची प्रचंड मागणी

0

जळगाव (नेतल राठोड) । खान्देशात कैरीची मधुरता आणि त्रांची उपरुक्तता असल्राने कैरीची आवक जिल्ह्यात मोठरा प्रमाणात होत आहे. तोतापूरी, गावराण, राजापूरी रा विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. विशेषकरून कैर्‍रांना लोणचेसाठी जास्त मागणी आहे. कैरीला कालावधी मे ते जुलै महिन्यात अधिक मागणी आहे. रा महिन्रात कैरीच्रा विक्रीला भाव अधिक असला तरीही खवय्येगिरी मात्र कैरी खरेदी केल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रात खान्देशात घरोघरी लोणचे बनविण्याचे प्रमाण अधिक आहे.

लोणचे बनविण्यासाठी महिलांची लगबग
जून व जुलै महिन्यात लोणचे बनविण्यासाठी सुरूवातीला खार बनविण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठी लागणार्‍या वस्तू बाजारात खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. जून महिन्यात गावरान कैर्‍यांना मोठी मागणी आहे. यात ग्राहकांची पसंत ही गावराण कैरीकडे असते. ही कैरी खाण्राला चविष्ट असते. बाजारात कैरीला सध्राचा बाजारात 40 ते 50 रूपये किलोचा भाव आहे. कैरीसह आवळा, लिंबूचे, मिरची पासून वेगवेगळ्रा प्रकारची लोणची बनविली जातात. हि लोणची 12 महिने व त्रापेक्षा जास्त टिकून राहते. बचत गटाच्या माध्यमातून कैरीचे लोणचे बनवून त्राची निर्रात विदेशात सुद्धा केली जाते. बाजारात कैरीची किंमत जास्त असुनही त्रांची उलाढाल लाखोंमध्ये होते. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण सोडले तर राज्यातील इतर ठिकाणी कैरी उपलब्ध होते, अशी माहिती कैरी विक्रेत्रांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना सांगितले.

आवकनुसार भावात वाढ
कैरीची लोणची बनविण्रासाठी लागणार्‍रा मसाल्राच्रा तसेच लोणची भरण्रासाठी लागणार्‍रा चिनी बरणीच्रा दुकानातही ग्राहकांची गर्दी पाहारला मिळत आहे.चिनीपासुन बनविल्रा जाणार्‍रा बरणीचे वेगवेगळे आकार पाहारला मिळतात ते दिसारला अत्रंत आकर्षक असल्रामुळे ग्राहकांचे लक्ष वेधुन घेते. म्हणून त्राची आवक वाढल्राने त्रा विक्रीच्रा भावात वाढ होत असते. राजापुरी 25 ते 30 रुपये किलो प्रमाणे तर गावराण कैरी 15 ते 20, सरदार 20 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे. कैरी फोडून देणार्यांना देखील रोजगार मिळाला आहे. कैरी फोडणार्‍यांनी स्वतंत्र दुकाने थाटली आहे. 5 रुपये किलो प्रमाणे कैरी फोडून देत आहे. कैरी फोडण्याच्या कामातून दिवसभरातुन 1 ते 2 हजार रुपये कमवित आहे. चीनी बरणी व मातीच्या मडक्याचे भाव तेजीत आहेत. साधारण लहान आकारात असलेल्रा बरणीची किंमत 250 ते 350 रूपरे असते आणि मोठ्या बरणीची 500 ते 550 दरम्रान किंमत असते. चीनीच्या बरण्या 75 रु पासून ते 700 रुपयापर्यत तर मातीचे मडके 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यत आहे.

गावरान कैरीकडे अधिक कल
आधुनिक पद्धतीने आणि वाण संक्रमित शेतीच्या माध्यमातून सध्या पिके व फळांची उत्पादने घेतली जात आहे. ही पिके घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रसायनिक प्रक्रियेचा अवलंब केला जात असल्यामुळे त्याची चवमध्ये बदल होते. मात्र गावरानी फळे किंवा कैर्‍या ह्या जरी पिकवायला वेळ लागत असला तरी ते रानेमेवाप्रमाणे गोड असतात. गावरानी कैर्‍यांच लोणचे अधिक चविष्ट आणि टिकावू असते. तब्बल दोन वर्षांपर्यंत देखील हे लोणचे टिकून असते. जरी लोणचे जुने झाले तर त्याचा उपयोग जनावरांना पोटफुगी झाल्यास त्याला काळेमिट टाकून एकत्रितरित्या दिल्यास पोटफुगी निघून जाते.