लोणजे येथील कब्बडी स्पर्धेची 23 वर्षांची अखंड परंपरा

0

चाळीसगाव । तालुक्याती लोणजे येथे नागपंचमीच्या सणाला कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेल्या 23 वर्षांपासून स्पर्धेची परंपरा कायम आहे. गुरुवारी 27 रोजी नागपंचमी निमित्त ही परंपरा अखंडीत ठेवत कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोणजे येथील आदर्श क्रीडा मंडळ आयोजित कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन आघाडीचे मल्ल हिंद केसरी रोहित पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सतीश दराडे, चित्रसेन पाटील, पद्माकर पाटील, छोटुबापू देशमुख, पंडित आण्णा चौधरी, सदानंद चौधरी, रविंद्र केदारसिंग पाटील, रमेशआबा चव्हाण, गोपालभाऊ अग्रवाल, योगेश अग्रवाल यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. चाळीसगांव तालुक्याचे सुपुत्र आणि तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचे वडील मल्ल नथ्थू चौधरी यांची देखील यावेळी उपस्थिती लाभली.

प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चव्हाण यांनी केले तर सुत्रसंचालक कांतीलाल राठोड यांनी केले. आभार डॉ .गोरख राठोड यांनी मानले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषीक चाळीसगाव येथील महाराष्ट्र लोकसेवा संघ या संघाला देण्यात आला. प्रथम पारितोषी 2001 रुपयाचे होते. तर उपविजेते लोणजे येथील आदर्श क्रिडा मंडळाला मिळाले. तृतीय पारीतोषिक एरंडोल व भुसावळ संघाना विभागुन देण्यात आले.