लोणवाडी शेतातील गोडावूनला आग ; सव्वा दोन लाखांचे नुकसान

0

भुसावळ- बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील शेताता गोडावूनला आग लागून तब्बल सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले. विकास नारायण पाटील (जामठी) यांचे लोणवाडी शिवारात गट नंबर 29/2 मध्ये शेत आहे. शेतातील गोडावूनला 13 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आग लागली. आगीत सात गाड्या कुट्टी, सात एकरावरील ठिबक, पीव्हीसी पाईप, फवारणीचे पंप, रासायनिक खर्ते, डिझेल इंजीन आदी जळून खाक झाले. बोदवड पोलिसात या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.