भुसावळ । येथील जळगाव रस्त्यावरील लोणारी मंगल कार्यालयाच्याबाजूस असलेले संपर्क कार्यालय अज्ञात व्यक्तीने पेटविल्याची घटना शुक्रवार 31 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र आगीत कॅबीनचे किरकोळ नुकसान झाले. जळगाव रस्त्यावरील लोणारी समाज मंगल कार्यालयाचे संपर्क कार्यालयाला 31 रोजी रात्री उशीरा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने शटरखाली पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत कॅबीनचे सुमारे 15 हजाराचे फर्निचर जळाले.
पोलीस निरीक्षक मोरे यांनी केला पंचनामा
घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांंनी भेट दिली. तर शहर पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक वसंत मोरे, एएसआय फारुक शेख व सी.पी. गाडगीळ यांनी पंचनामा केला. चार दिवसांपुर्वीच या भागातील एकाचे बँन्जो पार्टीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले होते. हिंमत असेल तर अशा उपद्रवींनी समोर असे कारस्थान करुन दाखवावे असे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सांगितले.