लोणावळा नगरपरिषदेच्या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन

0

लोणावळा: नगरपरिषद व लोणावळा हॉटेल असोशिएशनच्या वतीने पुष्प प्रदर्शन भरविण्यात आले आहे. भांगरवाडी येथील इंद्रायणी गार्डनमध्ये हे प्रदर्शन दोन दिवस भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या हस्ते झाले. विनय विद्वांस, बाबा शेट्टी, व्हि.एस. नारकर, नगरसेवक राजू बच्चे, भरत हारपुडे, बाळासाहेब जाधव, निखिल कविश्वर, दिलीप दामोदरे, देविदास कडू, माणिक मराठे, संध्या खंडेलवाल, आरोही तळेगावकर, रचना सिनकर, अपर्णा बुटाला, पुजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, अंजना कडू, सुर्वणा अकोलकर, गौरी मावकर उपस्थित होते.

…लौकिक टिकविण्याचे आवाहन
शहराची जगभरात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख आहे. हा नावलौकिक कायम राखण्यासाठी प्रत्येकांने झाडे लावण्याचा, जगविण्याचा संकल्प करावा. मागील वर्षी नगरपरिषदेने 10 हजार झाडे लावली होती. यावेळी देखील झाडे लावण्यात येणार आहे. सध्या वातावरणात बदल होऊ लागला असून इतर शहरांप्रमाणे लोणावळ्याचा पारा देखील वाढू लागला असल्याचे नगराध्यक्षा जाधव यावेळी म्हणाल्या. तरमहामार्गालगत आरपीटीएस शेजारच्या गार्डनच्या जागेचे सुशोभिकरण करून त्या ठिकाणी लेजर शो प्रकल्प राबवून अत्याधुनिक गार्डन बनविण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र दिवेकर व आभार स्वच्छता निरीक्षक दिगंबर वाघमारे यांनी मानले.