लोणावळा : पत्नीचा गळा दाबत तिला जीवे मारल्यानंतर 11 वर्षीय मुलीचाही गळा दाबून जीव घेणार्या या बापाने आपल्या 9 वर्षी मुलाचाही गळा घोटण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्याला काही तरी घडतेय असे वाटत असतानाच त्याने केलेला बचाव यशस्वी ठरला व तो सुदैवाने वाचला. मात्र अत्यंत संतप्त झालेल्या व दोघांचा जीव घेणार्या बबन धिंदळे (वय 38 वर्ष) याने स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली नि आपली जीवनयात्र संपविली. अंगावर शहारे आणणारी ही घटना लोणावळ्यातील ओळकाईवाडीतील क्रांतीनगर येथे रविवारी सकाळी घडली. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून कुटुंब पती बबन याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिस तपासातून अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.
नेमके काय घडले?
बबन धिंदळे आणि त्या पत्नी दीपाली (वय 30 वर्ष) व आपल्या दोन मुलांसह राहत असून रविवारी पहाटे बबनने पत्नी दीपाली आणि दोन्ही मुलांचा गळा आवळला, यात दीपाली आणि दिप्तीचा जागीच मृत्यू झाला. तर बबनने त्याचा मुलगा रोहित (वय 9) याचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण या हल्ल्यातून तो बचावला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र दरम्यानच्या काळात त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
कारण काय असावे?
पत्नी व मुलीचा जीव घेणार्या व मुलाचाही जीव घेऊ पाहणार्या बबन धिंदळेने एवढे टोकाचे पाऊल का उचलावे? असा प्रश्न सार्यांनाच पडला असून पत्नी दीपालीच्या चारित्र्यावर त्याचा संशय होता व या संशयातूनच त्याने संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट आखला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली असल्याचे सांगण्यात येत असले तरी लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या अधिक तपासातून या प्रकरणामागील सत्य बाहेर येऊ शकते.