लोणावळ्यात पुन्हा पावसाला सुरुवात

0

लोणावळा : मागील महिन्यात २७ आणि २८ जूनला थोडाफार प्रमाणात बरसल्यानंतर काही प्रमाणात उसंत घेतलेल्या पावसाने काल मंगळवार पासून दुपार नंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे लोणावळा शहरातील काही रस्त्यांवर पुन्हा पाणी भरले. यावर्षी पावसाची सुरुवात चांगलीच दमदार झाली. मात्र मागील आठवड्यापासून पाऊस बऱ्यापैकी थंडावला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आतापर्यंत बरसलेल्या पावसाचा विचार करता मागील वर्षीच्या केवळ निम्म्याच पाऊस नोंदविला गेला आहे.

मागील वर्षी ०३ जुलै रोजी पर्यंत एकूण १५०७ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला होता. यावर्षी मात्र ०३ जुलै रोजी पर्यंत केवळ ७६२ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. मागील विकेंडमध्ये या थंडावलेल्या पावसाचा फटका येथील पर्यटनाला बऱ्यापैकी बसला. पाऊसच नसल्याने भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याच्या बातमीने खुश होऊन आलेल्या पर्यटकांची मोठी नाराजी झाली होती. आणि याचा फटका येथील व्यावसायिकांना ही बसला होता. मात्र आता पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केल्याने, या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा फुलले आहे. कारण हा पाऊस कायम राहिल्यास पुढील आठवड्यात पर्यटक पुन्हा येथे गर्दी करतील हे निच्छित आहे.