लोणावळ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

हनुमान टेकडी येथील घटना; कारण अज्ञात

लोणावळा : येथील हनुमान टेकडी, भांगरवाडी परिसरात राहणार्‍या एका युवकाने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊपूर्वी घडली. या घटनेप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सचिन अर्जुन धोत्रे (वय 22, रा. हनुमान टेकडी, भांगरवाडी, लोणावळा) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे.

चुलतभावाने दिली माहिती
सचिन धोत्रे हा पेंटिंगची काम करत होता. त्याची आई काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी गेलेली होती. शुक्रवारी सकाळी सकाळी का उठला नाही, याची पाहणी करण्यासाठी गेल्यावर ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर सचिनचा चुलत भाऊ लक्ष्मण भगवान धोत्रे याने लोणावळा शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, सचिन याने आत्महत्या का केली, याचे कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.