पाचोरा – पाचोरा तालुक्यातिल लोहटार-खडकदेवळा गटातिल सर्व भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सक्रिय सदस्य, बुथ प्रमुख, गाव अध्यक्ष तसेच भाजपाचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, सदस्य व कार्यकर्ता बंधू भगिनींचा बुधवार १२ सप्टेंबर बुधवार दुपारी 3 वाजता पाचोरा येथे भव्य मेळावा आयोजित केला आहे.
यांची राहणार उपस्थिती
भडगाव रोडवरिल बचत भुवन येथे संपन्न होणार्या या मेळाव्याचे अध्यक्ष भाजपा जील्हाध्यक्ष उदय वाघ, उद्घाटक खासदार ए.टी.पाटील, प्रमुख उपस्थिती उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री, किशोर काळकर, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटिल, तालुकाध्यक्ष सुभाष पाटिल, सभापती बन्सिलाल पाटिल, पाचोरा तालुका सरचिटणिस प्रदिप पाटिल शहरप्रमुख नंदू सोमवंशी उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्यास लोहटार-खडकदेवळा गटातील सर्वांनी उपस्थित राहण्याचे अवाहन जि.प.सदस्य विजया पाटील, पं.स.सदस्य सुभाष पाटील व तालुका सरचिटणिस प्रदिप पाटिल यांनी केले आहे.