लोहारा कन्या शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात

0

शासकीय योजना आणि रूबेला लसीकरणाबाबत केले मार्गदर्शन
लोहारा – लोहारा केंद्रातील ऑक्टोबर महिन्यातील चौथी शिक्षण परिषद येथील कन्या शाळेत उत्साहात पार पडली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख बाबूराव धुंदाळे होते. शिक्षण परिषदेला लोहारा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापाक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिपप्रजवलन कार्यक्रमाचे अध्यक्षांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव धुंदाळे यांनी विविध शासकीय आर्थिक लाभाच्या योजना, गोवर रुबेला लसीकरण याबत गावात जनजागृती, शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करून आपल्या लोहारा केंद्राचा पाचोरा तालुक्यात नावलौकिक होईल यासाठी प्रयत्न करावे, असे देखील सांगितले.

विविध विषयांवर झाले मंथन
मुख्याध्यापिका मीनाक्षी बारबंद यांनी प्रास्तविक सादर केले. कन्या शाळेतील मुलीसाठी राबलेल्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती दिली. गुणवत्ता वाढिसाठी कन्या शाळेतील शिक्षक कसे प्रयत्न करत आहेत, हे सांगितले. त्यानंतर शहापुरा शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव यांनी त्यांची शहापुरा शाळा प्रगत करण्यासाठी केलेले त्यांचे प्रयत्न, लोकवर्गणीतून शाळेचा कसा विकास केला, 14 वित्त आयोगातून शाळा प्रोजेक्टेर मिळवला याबाबत माहिती दिली. कन्या शाळेचे शिक्षक समाधान माळी, विलास निकम, कृष्णा तपोने, गजाजन काटे, पंकज पालिवाल यांनी वेगवेगळया विषयांवर चर्चा करून त्याबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी उषा साळी, शितल महाजन, संद्या पाटील व सर्व शिक्षक वृंदानी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपोने व आभार शहापुरा शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव यांनी मानले.