लोहारा-कुर्‍हाड गटासाठी परिसरात भाजपाच्या प्रचारास प्रारंभ

0

वरखेडी । येथून जवळच असलेल्या सावखेडा येथील जागृत देवस्थान परिसरातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ बाबा मंदिरावर भारतीय जनता पार्टीच्या जि.प. व पं.स. उमेदवाराचा प्रचार नारळ फुटला. लोहारा व कुर्‍हाड जिल्हा परिषद गटातील व गणातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार अर्चना संजय पाटील कुर्‍हाड पं.स. गणातील संतोष भिका चौधरी (माळी) तर लोहारा पं.स. गणातून अनिता कैलास चौधरी हे निवडणुक लढवीत असून गटात प्रथम 20 वर्षानंतर भाजपाचे तीन ही अधिकृत उमेदवार निवडणुक लढवित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वाटेवर असून यावेळीच्या उमेदवाराना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद अण्णा चेनार, चंद्रकांत पाटील, बाळू जैन, कैलास चौधरी, संतोष चौधरी, शांताराम पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

वरखेडी भोकरी गावात घेतली मतदारांची भेट
या गटातील प्रचाराचे नारळ सावखेडा येथील श्रीक्षेत्र भैरवनाथ बाबा मंदिरात शांताराम पाटील, अर्चना पाटील, संतोष चौधरी, अनिता चौधरी यांनी नारळ वाढवून प्रचाराला श्री गणेशा केले. याप्रसंगी सुत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी वरखेडी-भोकरी या गावी मतदारच्या घरी जावून भेट घेतले. यावेळी काँग्रेसचे संतोष दौलत पाटील यांनी भाजपा उमेदवाराच्या प्रचारात किरण पाटील, सुभाष माळी, डॉ. प्रदीप महाजन, मनोज शिंपी, डॉ. विकास पाटील, उस्मान अमीर शेख, सुलतान रज्जाक कुरेशी, शमी सुलेमान, कांकर हवलदार, बाळु पाटील, विश्राम देवरे, सतीष राजपूत (माळी), लक्ष्मण पाटील, संजय पाटील, मनोज पाटील, सुपडू पाटील यांसह वरखेडी-भोकर लासुरे, आंबे वडगाव – कुर्‍हाडे, कळमसरा, कासमपुरा-लोहारा सर्व गटातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.