लोहारा । पाचोरा तालुक्यातील लोहारा – कुर्हाड जि.प. गटात तिरंगी लढत होत असून सेना व भाजपा स्वतंत्र निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमावित आहेत तर यावेळी या गटात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून जिल्हा परिषदेतील आजच्या सत्ताधार्यांच्या विरोधात पुन्हा एकदा हा गट आपल्याच ताब्यात यावा म्हणून जोरदार लढत देण्याच्या प्रयत्नात आहेत.
उमेदवार अनिता चौधरी, कुर्हाड गडाचे उमेदवार संतोष चौधरी यांचेसह शांताराम पाटील, डॉ. बाबू जैन, शरद सोनार, चंद्रकांत पाटील कैलास चौधरी यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रचार नारळ फुटल्यानंतर गावातून फेरी काढण्यात येऊन शक्तीप्रदर्शन करण्यात आले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारच्या प्रचाराचा नारळ महादेव मंदिरात फोडण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, संजय गरूड, खलील देशमुख, जि.प. गटाचे उमेदवार वंदना अशोक चौधरी, लोहारा गणाच्या उमेदवार रंजना सुरेश चौधरी, कुर्हाड गणाचे उमेदवार डॉ.शाम पाटील, डॉ. देवेंद्र शेळके, ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, खलील शेख, सुभानगनीदादा यांचेसह कळमसरे व लोहारा म्हसास येथील आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातून प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.