लोहारा धरणातील पाणी चोरी रोखण्यासाठी अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

0

लोहारा । ज्या धरणाच्या पाण्यावर 15 ते 20 हजार लोकसंख्या अवलंबून आहे, त्या लोहारा धरणामधुन पाण्याची चोरी सुरुच असुन अधिकारी वर्गाकडून अचानक पथका द्वारे कारवाईचे नाटक करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होतांना दिसून येत नसल्याने अद्यापही पाणी चोरी सुरुच असल्याने डिसेंबर अखेरीस गावास भीषण पानी टनचाईला सामोरे जावे लागन्याची शक्यता नकारता येत नाही. लोहारा येथील पाणीपुरवठा हा बांबारुड राणीचे येथील धरणाजवळील विहीरीवरुन तसेच लोहारा धरणामधील विहीरी वरुन होतो. मात्र यावर्षी झालेला कमी पाऊस झाल्याने दोन्ही धरणामध्ये जेमतेम 15-20 टक्के पाणी साठा जमा झाल्याने येथे यावर्षी पाणीटंचाई निश्‍चित जाणवणार आहे, असे चित्र आहे. मात्र जे पाणी आहे ते देखील चोरी केले जात असेल तर मार्च महिन्यापासून होणारी टंचाई जानेवारीपासूनच जाणवेल हे मात्र नक्की.

दंडात्मक करावाई करूनही शेतकर्‍यांकडून पाणी चोरी
येथील ग्रामपंचयती मार्फत आक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शासकीय अधिकार्‍याकडे निवेदन देऊन पाणी चोरी रोखण्याबाबत उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागा मार्फत तसेच पाचोरा तहसीलदार यांच्या नेतृत्वात भरारी पथकाद्वारे मध्यंतरी अचानक छापे टाकण्यात आले होते. त्यात काही शेतकरी पाणी चोरी करतांना आढळून देखील आले. मात्र त्यांच्या विरोधात दंडात्मक करवाया करण्यात आल्या नाही. त्यामुळे अद्यापही काहीजण लोहारा धरणातून पाणीचोरी करीत असल्याचे कळते. याबाबत ग्रामपंचायत सरपंचाशी संपर्क साधला असता तुम्ही धरणाच्या आजूबाजूने जेसीबीने 5 फुटाची चारी करून पानीचोरी करणार्‍यांचे पाईप तोडून टाकावे असा उपाय करण्याचे सांगितले. त्यावर त्यांनी सांगितले की या क्षेत्रात चारी करण्याचा आम्हाला अधिकार नाही तसे अधिकृत पत्र पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीस दिले तर ग्रामपंचायत स्वखर्चाने चारीचे काम करून घेईल असे सांगितले. अद्यापही होणारी पाणीचोरी रोखली गेली नाही. तर डिसेंबर अखेरीसच म्हसास व लोहारा या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल हे मात्र निश्‍चित.