लोहारा । लोहारा शहर पत्रकार मंचद्वारा 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक गटासाठी लोहारा शहर अंतर्गत निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल 25 जानेवारी रोजी जाहीर झाला असून यातील विजेत्यांना प्रजासत्ताकदिनी प्रमाणपत्र व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले आहे.
या स्पर्धेत माध्यमिक गटात डॉ.जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावीच्या 180 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात प्रथम क्रमांक संकेत चौधरी, द्वितीय अबुजर पटेल, तृतीय कु.किरण पाटील, सपना पवार अन्तेजनार्थ बक्षिस मिळवून विजेते ठरले आहे.
निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
या गटासाठी मी पत्रकार झालो तर विषय देण्यात आला होता. त्याचप्रमाणे प्राथमिक गटात येथील कन्याशाळेतील दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनींनी सहभाग घेतला होता. मात्र, यात प्रथम क्रमांक कु.वर्षा ओतारी, द्वितीय कु.नम्रता चौधरी, तृतीय कु.अंकिता पाटील तर योगीता माळी उत्तेजनार्थ बक्षिस मिळवून विजेते ठरल्या. या प्राथमिक गटासाठी ‘माझी शाळा डिजीटल शाळा’ हा विषय देण्यात आला होता. सर्व विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी डॉ.जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. येथील पत्रकार मंच गेल्या चार वर्षापासून पत्रकार दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. याबद्दल उपस्थितांनी पत्रकार मंचाला धन्यवाद दिले व कौतुक केले.