लोहारा परिसरात बस सेवा सुरु करण्याची मागणी

0

लोहारा । एकेकाळी एस.टी.चा मीनी डेपो म्हणून ओळख असलेल्या लोहारा गावाकडे गेल्या काही वर्षापासून या परीसरात वाढलेलया अवैध प्रवाशी वहातुकी मुळे व एस.टी. मंडळाने पुर्णतः दुर्लक्ष केल्या मुळे आज या परीसरात एस.टी. महामंडळाची बस क्वचीतच दृष्टीस पडते. या भागात जर एस.टी. महामंडळाने शटल व्यवस्था सुरु केली तर प्रवाशी वर्गाला फार मोठा दिलासा मिळणार असल्याने या परीसरासाठी स्पेशल शटल सेवा सुरु करावी, अशी मागणी लोहारा प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र शेळके यांनी केली आहे.

या भागातील पाचोरा ते लोहारा तसेच लोहारा ते पहूर या भागातील प्रवाशांची सध्या मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावर जी अवैध वाहतुक चालते त्या वहानांमधून प्रवाशांना आपला जिव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. पाचोरा आगारातून आज रोजी पाचोरा ते पिपंळगाव हरेश्‍वर पाचोरा ते नगरदेवळा येथे ज्या प्रकारची दर अर्धा ते एक तासाला शटलची बस सेवा सुरु आहे. त्याच प्रकारे पाचोरा ते लोहारा कुर्‍हाडमार्गे, पाचोरा ते पहूर, लोहारा कुर्‍हाड मार्गे तसेच पाचोरा ते सोयगाव व्हाया लोहारा शेंदूर्णी मार्गे शटल सेवा सुरु करावी. यामुळे प्रवाशांचे होणारे हाल टाळता येतील त्यासाठी वरील प्रकारच्या बसफेर्‍या सुरु कराव्या अशी मागणीही या निवेदनात केली आहे.