लोहारा येथील डॉ.पंडीत विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

0

लोहारा। शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिन निमित्त डॉ.जे.जी.पंडित विद्यालयात दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक भिमराव शेळके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक एस.आर.माने, अ.अ.पटेल, डॉ.भास्कर वाघ, शरद सोनार, डॉ. बाळू जैन, सुरेश चौधरी, किशोर धांडे, माणिक जाधव, ईश्वर देशमुख, गुलाम गौस पटेल, विकासो चेअरमन शोभा चौधरी, प्रताप चौधरी, मंदोर नाईक, रामधन शिंदे, एस.एस. पाटील व पत्रकार बांधव उपस्थित होते.

लोहारा पत्रकार मंचतर्फे या वर्षापासून उपक्रमास सुरूवात
प्रास्तविक मुख्यध्यापिका सी.एस.डोळे यांनी केले. यावेळी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना भिमराव शेळके यांचेमार्फत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी लोहारा पत्रकार मंचचे अध्यक्ष रमेश शेळके यांनी या वर्षापासून सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच भाजप कार्यकर्ते शरद सोनार यांनीही वह्यांचे वाटप केले. डॉ.पंडित विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या अबुजर पटेल याचा अनेक बक्षिसे देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.

यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
तु.आ. माळी पतसंस्था, डॉ. भास्कर वाघ, मंदोर नाईक, माने सर, ए.जी.सोनवणे, व्ही.डी. गरुड, पुरुषोत्तम सुर्वे, राजेंद्र परदेशी, इंगळे सर, माणिकराव जाधव, प्रभाकर चौधरी, मधुकर कासार यांसह अनेक संस्था, शिक्षक यांनी अनेक बक्षिसांचा वर्षाव करून गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक ए.एस.चौधरी, पुरुषोत्तम सुर्वे, डी.एम.गरूड, एस.के.पाटील, एस.एस.गुजर व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन विजय शिरापुरे यांनी केले तर आभार राजेंद्र परदेशी यांनी मानले.