लोहारा। दिवसें दिवस रेशनींगच्या धान्यामध्ये होत असलेला काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. मात्र यापुढे ई-पॉस पद्धतीने धान्याचे वाटप करण्याचे स्पष्ट आदेश सर्व धान्य दुकांदारांना देण्यात आले असून या निर्णयाची आमंलबजावनी नुकतीच येथील धान्य दुकानात करण्यात आली. यापुढे प्रत्येक कार्ड धारकाला स्वतः आपल्या बोटाचा ठसा देऊनच धान्याची खरेदी करता येणार आहे. दरम्यान गेल्या महिन्यापर्यंत बीपीएल धारकांना प्रती यूनिट अर्धा किलो साखर मिळत होती,
मात्र यावेळी आलेलीच नाही तर अंत्योदय कार्डधारकांना गेल्या महिन्यात प्रती यूनिट अर्धा किलो साखर मिळत होती ती या महिन्यात प्रती कार्ड एक किलोच दिली जात असल्याने कार्डधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.येथील धान्य दुकानातुन 1 हजार 682 कार्ड धारक स्वस्त दरातील धान्याचा लाभ घेत असतात त्यातील 560 कार्डधारक हे अंत्योदय प्रकारातील असुन उर्वरीत 1 हजार 122 हे प्राधान्य कुटुबं प्रकारातील आहेत. या प्रकारात बी.पी.एल.कार्ड धरकांचा देखील समावेश आहे. या महिन्यात येथील धान्य दुकानातुन अंत्योदय कार्ड धारकाला प्रती कार्ड एक कीलो साखर, चौदा किलो तांदूळ व एकविस किलो गहु असे धान्य वाटप होत आहे. तर प्राधान्य कुटूंब कार्डधरकांना प्रती यूनिट दोन किलो तांदूळ व तीन किलो गहु या प्रमाणात धान्याचे वितरण होत असल्याची माहीती या विभागाचे सेल्समन उज्वल पालीवाल यांनी दिली.