लोहारा येथे बैलजोडी, म्हशींची चोरी

0

लोहारा । पाचोरा तालुक्यातील चोरीची घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यात चोरीचे सत्र सुरुच आहे. दरम्यान तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी मुरलीधर दौलत गीते (अमर टेलर) यांची बैल जोडी व दोन म्हशीं चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी गोठ्या चे कुलूप तोडून चोरी केली आहे. मुरलीधर गीते यांचा गुराचा गोठा शेतात असून त्याला कुलुप लावलेले होते. मात्र चोरांनी कुलूप तोडून गोठ्यातील दोन म्हशी व एक बैल जोडी असे चार जनावरे चोरुन नेल्याचे घटना रात्री घडली. गीते हे जेव्हा सकाळी शेतात गेले तेव्हा जनावरे चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पोलीस स्टेशन गाठून चोरीची तक्रार देण्यात आली.

सदर जनावरे हे कत्तल खाण्यात गेले असावेत असा संशय संबधित शेतकर्‍यांकडून व्यक्त केला जात आहे. 15 दिवसापूर्वी देखील येथील एका शेतकर्‍याचे गुरे चोरीला गेले आहे. गेल्या 2 वर्षांपासून परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ झल्याचे दिसून येत आहे. मात्र स्थानिक पोलीस अजूनही गुन्हेगाराला पकडू शकले नाही. त्यामुळे गावात आश्चर्य व्यक्त होत आहे. आधीच शेतकरी अडचणीत असताना शेतकर्‍याचे हे सुमारे सव्वा ते दीड लाखा पर्यंतचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चोरीच्या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यात घबराटीचे चे वातावरण निमार्ण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्ती घालण्यास सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थ व व्यापारी वर्गाकडून होत आहे.