पाचोरा: तालुक्यातील लोहारा येथील काशिनाथ यशवंत राजपूत (६०) व त्यांचा भाचा गोपाल रघुनाथ राजपूत (२५ ) हे आज शुक्रवारी शेतात गेले असता त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. यात वृद्ध काशिनाथ राजपूत यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काशिनाथ राजपूत यांना उपचारासाठी पाचोरा येथे दाखल करण्यात आले मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मयताच्या पश्चात दोन भाऊ पुतणे असा परिवार आहे.