लोहारा । पाचोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा तालुका मोतिबिंदु मुक्त करण्याचा सकंल्प केला असुन याचाच एक भाग म्हणून लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार 21 जून रोजी कांताई नेत्रालय पुणे व जळगाव तसेच शिवसेना पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने मोतिबिंदु शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी शिबिराच्या आयोजना चा उद्देश सांगून जास्तीत जास्त मोतिबिंदु रुग्णांनी या शिबीराच्या माध्यमातून लाभ घेण्याचे आवाहन केले.
यशस्वितेसाठी यांनी केले सहकार्य
त्याचप्रमाणे अश्या प्रकारचे शिबीर पाचोरा तालुक्या तील प्रत्येक जि.प.गटातील आत्तापर्यंत जवळपास शंभरच्या वर रुग्णांचे मोतिबिंदु काढण्यात आले असल्याची माहीती देखील आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थितांना दिली. यावेळी अरुण पाटील, गणेश पाटील, नानाभाऊ वाघ यांनी आपले विचार व्येक्त केले. कार्यक्रमास अॅड.दिनकर देवरे, दीपक राजपुत, नंदू राजपुत हजर होते. तसेच यावेळी कांताई डॉ.भरत साळवे, डॉ. संतोष पवार, डॉ.प्रमोद महाजन, डॉ.प्रमोद जैन यांनी रुग्ण तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ.पांढरे यांनी सहकार्य केले.