लोहारी खुर्द येथील दोन दाम्पत्य हजसाठी रवाना

0

वरखेडी । येथून जवळच असलेल्या लोहारी खुर्द येथील माजी उपसरपंच इस्माईल हसन मुसलमान व विदमान ग्रा.पं.सदस्या रशिदा बी इस्माईल मुसलमान तसेच माजी ग्रा.पं.सदस्य नुरा कासम मुसलमान व हसीनाबी नूरा मुसलमान हे पती-पत्नी 17 ऑगस्ट रोजी हज यात्रेसाठी मंबईला रवाना झाले. त्या निम्मिताने झालेल्या छोट्या खाणीत समारंभात आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा पं.स.सभापती सुभाष पाटील, डी.एम.भाऊसाहेब, पी.डी.भोसले यांनी शाल व पुष्पहार देऊन या दोन्ही कुटूबियांना हज यात्रेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती
‘बळीराजाला चांगले दिवस येवो, सुखसमृद्धी नादो यासाठी जातीय सलोखा भाईचारा वाढीस लागो‘ या दुवा मांगा अशी अपेक्षा वेक्त केली. यावेळी माजी नगरसेवक गणेश पाटील, हाजी मुख्तार शेठ कुरेशी, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप पाटील, सतीष पाटील, विकासोचे हमीद चॉद, हाजी सईद कुरेशी, हाजी रईस कुरेशी, मौलना अरमान साहाब, लतीफ हलवाई, रशीद हाजी उखर्डू, जमील रज्जाक, सुलतान कुरेशी, प्रवीण पाटील, शरद पाटील, डॉ.जिवन पाटील, डॉ.रविंद्र पाटील, रशीद हजी उखर्डू माजी पं.स.सदस्य यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ हजर होते.