वरखेडी : गावातील सर्व लोक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दारुच्या आहारी राहत असून दारुच्या नशेत कामधंदे करीत नाही. तसेच वर्षातील येणारा स्वंयरोजगार कपाशी, मका, ज्वारी, बाजजरी या रब्बी हंगामाकडे देखील लक्ष देत नाही. यामुळे घरसंसार उद्धवस्त होण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने गावातील महिलांनी सुरु असलेल्या अवैध दारु धंदा बंद होण्यासाठी पिंळगाव हरे. पो.स्टेचे उपनिरीक्षक, डी.वाय.एस.पी. तसेच पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले आहे.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
या निवेदनाचे तात्काळबाब लक्षात घेवून, गावात दवंडी पिटवून प्रत्येक नागरिकाला समज देवून दारु विक्री बंद करावी, अन्यथा गावातील सर्व महिला रस्त्यावर उतरून महिला शक्ती प्रदर्शन करु, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शोभाबाई भिल, हिरकणबाई पाटील, सुनिता पाटील, वंदना पाटील, मनिषा पाटील, शिमा पाटील, संगिता खैरनार, सुरस्ताबाई पाटील, उषा जाधव, अन्नपुर्णा कोळी, मंगला पाटील, अरुणा जाधव, वैशाली पाटील, शोभाबाई बडगुजर, लताबाई पवार, लताबाई पाटील, अरुणाबाई बडगुजर, आरती विनोद बडगुजर यांच्या स्वाक्षर्या आहेत.