पाचोरा । पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्म शताब्दी वर्षा निमित्त भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका व वैद्यकीय आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. कान, नाक, घसा यास रोगासंबंधी शिबीरात तपासणी करण्यात आली. पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरात एकुण 104 रुग्णांची तपासणी करण्यात आली. रुग्ण तपासणी कान, नाक, घसा तज्ञ तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी केली. शिबीराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद शेलार, तालुका उपाध्यक्ष शरद पाटील, शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, जेष्ठ कार्यकर्ते शालिक पाटील, नंदु सोमवंशी, प्रदीप पाटील, गोविंद शेलार, शरद पाटील, श्रावण बडगुजर, बापू जोशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.