लौकी येथे पटेल महाविद्यालयातर्फे रक्तगट तपासणी

0

शिरपूर । येथील आर.सी.पटेल विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागातर्फे शिरपूर तालुक्यातील लौकी येथे 15 वे एक दिवसीय रक्त गट तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिर घेण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन शिरपूर येथील तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी डॉ. पितांबर दिघोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्वीय सहाय्यक अशोक कलाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, शासकीय आश्रम शाळा लौकीचे मुख्याध्यापक मनोहर भामरे, लौकीचे सरपंच, उपसरपंच, वि.का.सो. चेअरमन, ग्रा.पं. सदस्य आदी उपस्थित होते.

डॉ.पाटील यांचे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत रक्त गट तपासणी व विविध रोगांविषयी जनजागृती करण्याचा होता. सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थांनी विविध रोगांविषयी मार्गदर्शन करणारे विविध फलक तसेच गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्याचे एकूण पाच प्रयोग सादर केले. सदर शिबिरात शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिक मिळून एकूण 543 लोकांनी आपला रक्तगट व बी.एम.आय. जाणून घेतला तसेच शिरपूर येथील सुप्रसिद् बाल रोग तज्ञ डॉ. दीपक गिरासे व दंत चिकित्सक डॉ. गुंजन पाटील यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्या्ंची यावेळी मोफत तपासणी केली. तसेच डॉ.पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी विभाग प्रमुख डॉ.उल्हास पाटील, डॉ. रविंद्र पाटील, प्रा.संदीप पाटील, प्रा.महेश पाटील, प्रा.माधवी शिरसाठ, प्रा.भूषण भदाणे, प्रा.नरेंद्र मोकाशे, डॉ.अश्विनी पाटील, डॉ.मोहिनी पाटील, प्रा.शुभांगी पटेल, प्रा.लीना शिरसाठ, प्रा.अश्विनी पाटील, प्रा.मृणाली ठाकरे, गणेश सोनार, बन्सीलाल चौधरी, संजय मोरे, डी.यु.पटेल आदींनी सहकार्य केले.