मुंबई: वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या समाजाच्या उल्लेखासह २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणए, विदर्भ, लातूर, जळगाव आणि नगरमधील जागांचा या यादीत समावेश आहे. एमएमआयने औरंगाबाद आणि सोलापूरमधील त्यांच्या उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहे. त्यापार्श्वभूमीवर वंचितच्या या पहिल्या यादीत औरंगाबाद आणि सोलापूरमधील जागांचा समावेश करण्यात आलेला नसल्याने वंचित आणि एमआयएम दरम्यान आघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
वंचितने पहिल्या यादीत ढीवर, नंदीवाले, काची-राजपूत, छप्परबंद, माना, पटवे-मुस्लिम, माडिया, मनियार आणि भिल्ला आदी वंचित समाजातील उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत दोन डॉक्टरांचा समावेश आहे.