वंचितांचा इतिहासातून आंतरविद्याशाखीच महत्व वाढवणे गरजेचे

0

प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील ; नाहाटा महाविद्यालयात सामाजिक शास्त्र सप्ताहास सुरुवात

भुसावळ- इतिहासाचा चिकित्सक अभ्यास करणे गरजेचे असून इतिहास लेखनात वंचितांचा इतिहास लिखाण करून आंतरविद्याशाखीय महत्व वाढवून उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे मत एम.एम.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील यांनी व्यक्त केले. कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात सामाजिक शास्त्र विभागांतर्गत मंगळवार, 8 जानेवारीपासून ‘सामाजिक शास्त्रातील नवे प्रवाह’ या विषयावर आधारीत सप्ताहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

इतिहासाबाबत प्रबोधन
प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील यांनी आपल्या व्याख्यानात स्त्रीवादी इतिहास लेखन, सुधारणावादी, साम्राज्यवादी मार्क्सवाद, स्त्रीवादी तसेच वंचितांच्या घटकांमध्ये आदिवासी, दलित, तृतीयपंथीय, शोषित व पीडित यांची कश्या प्रकारे नोंद घेतली जात आहे तसेच वंचितांच्या इतिहास लिखाणाची तुलना करताना भारतात महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रिया, दलित, अस्पृश्य, आर्थिक, सामाजिक, राजकीय शोषितांच्या इतिहासाची सर्वप्रथम कशी मांडणी केली याचे विस्तृत उद्बोधन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एम.व्ही.वायकोळे होत्या. 14 पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. प्रास्ताविक समन्वयक उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी तर कार्यक्रमाची भूमिका व प्रमुख वक्त्यांचा परीचय प्रा.प्रफुल्ल इंगोले यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.पी.ए.अहिरे यांनी तर आभार प्रा.दीपक शिरसाठ यांनी मानले.