वंचितांना मायेची ऊब देण्यातच खरे दातृत्व

0

रजनी सावकारे : कै.अनसुयाबाई रामचंद्र झोपे यांच्या स्मरणार्थ चादरींचे वाटप

भुसावळ- ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला हवे, वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचायला हवी, हीच बाब ध्यानात घेऊन राजेश झोपे यांनी त्यांची आई कै.अनसुयाबाई रामचंद्र झोपे यांच्या स्मरणार्थ जि.प.शाळांमध्ये आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट सोलापूरी चादरींचे वाटप करण्यात आले. वंचितांना मायेची ऊब देण्यातच खरे दातृत्व झोपे परीवाराने जोपासले असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे संजय यांनी येथे केले. भिलमळी व जोगलखोरी जिल्हा परीषदेत त्यांच्या हस्ते चादरींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
भुसावळ येथील मध्य रेल्वेतील लोको पायलट राजेश रामचंद्र झोपे यांनी त्यांच्या मातोश्री कै.अनसुयाबाई रामचंद्र झोपे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परीषद शाळा जोगलखोरी व जिल्हा परिषद शाळा भिलमळी या दोन्ही शाळांमध्ये सोलापूरी चादरी भेट दिल्या. दोन्ही शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक शांताराम पाटील, बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील, दाते राजेश झोपे, वैशाली झोपे, मानसी झोपे, ज्ञानेश्वर नेहेते, ज्योती नेहेते आदींची उपस्थिती होती. डॉ.जगदीश पाटील यांनी समाजातील सर्वच घटकांच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या शिक्षकांचे कौतुक केले. जोगलखोरी येथे मुख्याध्यापिका अर्चना महाजन यांनी प्रास्ताविक केले.

यांनी घेतले परीश्रम
राजेंद्र महाजन, दीपक पाटील, अनिल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश भील यांनी सहकार्य केले. भिलमळी येथे आयोजित ‘संकल्प दातृत्वाचा व बेटी बचाव बेटी पढाव’ या कार्यक्रमात मुख्याध्यापिका माधुरी पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्या पाटील, प्रीती अंबादे, बाबू पवार, रमेश पवार, बाळू पवार यांनी सहकार्य केले.