जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे शहरातील लाडवंजारी समाज मंगल कार्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र दराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वा.ना. आंधळे, वरणगाव न.पा.चे नगराध्यक्ष सुनील काळे, प्राचार्य सुरेश वराडे, आगारप्रमुख संजय खडसे, आर.टी.ओ. अधिकारी पांडुरंग आव्हाड, राजेंद्र पाटील, माधुरी पालवे, मंदा फड, किरण पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक, विविध क्षेत्रातील कतृर्त्ववान समाज बांधव आणि वंजारी समाजातील पहिली सीए परीक्षा उत्तीर्ण झालेली ऐश्वर्या सतीश सांगळे, हिचा गौरवपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच १५० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तर दहावी, बारावी शालांतर परीक्षेत प्रथम आलेल्या दोन विद्यार्थिनींना सायकली भेट देण्यात आल्या. तसेच विधान परिषदेवर निवडून आलेल्या आ. नरेंद्र दराडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रशांत नाईक, नामदेव वंजारी, महादू सोनवणे, भानुदास नाईक, उमेश वाघ ,अनिल घुगे, योगेश घुगे, संतोष घुगे, चंदुलाल सानप, सुनील नाईक, उमेश आंधळे, सचिन ढाकणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कवी मनोहर आंधळे यांनी तर, आभार उमेश वाघ यांनी मानले.