मंचर : विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आवड व जागरूकता निर्माण केली पाहिजे. प्रदुषणामुळे होणार्या नुकसानीची भरपाई झाडे लावून जोपासना केल्यामुळे कशी भरून निघेल. तसेच आवळा या फळझाडाचे आयुर्वेदातील महत्त्व स्कूलचे अध्यक्ष योगेश लिंगे यांनी पटवून दिले. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथील वंडर किडस प्री स्कूलमध्ये ‘एक मूल एक झाड’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. स्कूलमधील शिकणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूलच्या वतीने झाडांचे एक रोपटे देण्यात आले. आवळा या आयुर्वेदीक फळझाडांची दोनशे कलमी रोपे विद्यार्थ्यांना वाटली.
आलेल्या मान्यवरांच्या आणि शिक्षिकेच्या सन्मान झाडांची रोपे देऊन करण्यात आला. या उपक्रमामुळे मुले पर्यावरणाशी जोडली जातात. झाडांचे वाटप सरपंच सुनिता कराळे, ग्रामपंचायत सदस्या संगिता शिंदे, स्कुलचे अध्यक्ष योगेश लिंगे, मयूर पतसंस्थेचे व्यवस्थापक महादेव गावडे, स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी लिंगे, ई-सेवा केद्राच्या संचालिका प्रिती ठेंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन स्कूलच्या हेमा शेलार, अक्षदा गायकवाड, आरती हिंगे, श्वेता लोणकर व रूपाली वायाळ या शिक्षिकांनी केले. तर शुभांगी लिंगे यांनी आभार मानले.