नवी दिल्ली । नवी दिल्लीच्या 15 वर्षीय वंतिका अगरवालने केटलन सर्किट बुद्धिबळ स्पर्धेत महिला आंतरराष्ट्रीय मास्टर किताबावर शिक्कामोर्तब केले. या किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म वंतिकाने या स्पर्धेत मिळवला. आधीचे दोन नॉर्म वंतिकाने मुंबई, शारजामध्ये मिळवले होते.