मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण यांना दुसऱ्यांदा राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्राकडून 6 जण राज्यसभेवर निवडून जाणार असून त्यापैकी राष्ट्रवादीची एक जागा निश्चित आहे. राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी यांना उमेदवारी मिळेल, असे वाटत होते. पण, एकच जागा असल्याने आणि त्रिपाठी यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याने चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाली.
हे देखील वाचा
पुणे आणि पिंपरी चिंचवड हा भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. पण मोदी लाटेत हे गड कोसळल्याने या दोन्ही भागांत पक्षाचा एकही आमदार आणि खासदार नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.