वंदना पाटील‘आंबेडकर सेवारत्न’पुरस्काराने सन्मानित

0

जळगाव । मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशनतर्फे विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त नुकत्राच झालेल्या कार्यक्रमात वंदना भगवान पाटील यांना विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्द्ल आमदार सुरेश भोळे, भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे, जि.प.सदस्य पल्लवी देशमुख यांचा हस्ते गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर किशोर पाटील, इकरा संस्थेचे अध्यक्ष अ.करीम सालार, नगरसेविका अश्‍विनी देशमुख, प्रवीण पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सलीम इनामदार, राजेश जाधव, अ‍ॅड.विक्रम परिहार उपस्थित होते.