‘वंदे मातरम्’वरून राडा; तीन नगरसेवक निलंबित

0

औरंगाबाद । देशात वंदे मारतम यावरून गोंधळ सुरू आहे.याचे पडसाद औरंगाबाद महापालिकेत पहावयास मिळाले आहे. सर्वसाधारण सभेला वंदेमारतम् ने सुरवात झाली. मात्र एमआयएम व कॉग्रेंसचे नगरसेवक बसूनच होते.यानंतर सत्ताधारी भाजपा-सेना व एमआयएमच्या नगरसेवकामध्ये घोषणाबाजीला झाली.घोषणाबाजीला नंतर बाचाबाची झाली यानंतर सेना -एमआयएमच्या नगरसेवकामध्ये धक्काबुक्की झाली. यात सभागृहातील माइक ,पंख्यांची तोडफोड करण्यात आली.याप्रकरणामुळे तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे.

एमआयएम, काँग्रेसचे नगरसेवक निलंबित
महापालिकेच्या सर्वसाधार सभेला आज ’वंदे मातरम्’ने सुरुवात झाली. हे गीत सुरू असताना विरोधीे नगरसेवक बाकावर बसून होते. युतीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत ’भारत माता की जय’ आणि ’वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या. काही नगरसेवकांनी महापौरांसमोरच्या हौद्यात येऊन घोषणाबाजी सुरू केली. यामुळे संतापलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.हा गोधळ वाढला असता महापौरांनी कामकाज तहकूब केले.कामकाज तहकूब झाले असतांना युतीच्या नगरसेवकांनी भगव्या शाली फडकवल्या.त्यावेळी याला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमच्या नगरसेवकांनी बाकांवरील माइक काढले व पंख्यांची तोडफोड केली. याप्रकरणी दोन नगरसेवकांना निलंबित केले.तर गोंधळाप्रकरणी एमआयएमचे सय्यद मतीन, शेख जफर, व काँग्रेसचे सोहेल शेख यांच्यासह तिघांना एक दिवसासाठी निलंबित केले.