वंदे मातरम् म्हणा, पण सक्तीही नको

0

मुंबई । प्रत्येक भारतीयाने वंदे मातरम बोललेच पाहिजे मात्र त्यासाठी कोणी जबरदस्ती करू नये आणि कोणी वंदे मातरम बोलणार नाही म्हणून अराष्ट्रीय भूमिका घेऊन वाद करू नये, असे सांगत सर्वांनी वंदे मातरम बोलले पाहिजे अशी भूमिका मांडून काँग्रेसमधील नेते नारायण राणे यांचे काँग्रेसमध्ये भवितव्य घडणार नाही त्यासाठी त्यांनी भाजपमध्येच प्रवेश केला पाहिजे,माझा रिपाई चळवळीचा पक्ष आहे, मात्र राणेंना रिपाई फायदेशीर नाही, असे ते म्हणाले.

झोपड्यांना कायदेशीर संरक्षणचा ठराव
मुंबई महापालिकेच्या सन 2017 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपड्यांना कायदेशीर संरक्षण शासनाने द्यावे असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित झोपडपट्टी हक्क परिषदेत करण्यात आला. भरपावसात बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात प्रचंड गर्दीत झोपडपट्टी हक्क परिषद आयोजित करण्यात आली .त्यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मत्स्यव्यवसाय आणि दुग्धविकास मंत्री ना महादेव जानकर यांच्या तोफा कडाडल्या.