वकिलांच्या कल्याणकारी योजनेला भुसावळातील वकिलांचा पाठिंबा

0

नायब तहसीलदार संजय तायडे यांना पदाधिकार्‍यांनी दिले निवेदन

भुसावळ- बार कौन्सील ऑफ इंडियातर्फे वकिलांच्या कल्याणकारी योजनेसाठी राज्य वकील परीषद व उच्च न्यायालयातील वकील संघटनांची दिल्ली येथे बैठक होवून त्यात वकीलांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याची मागणी करण्यात आली असून या योजनेला तालुका वकील संघाने सोमवारी तहसीलदारांना निवेदन देऊन पाठिंबा दर्शवला. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. तुषार पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

तहसील प्रशासनाशी चर्चा
वकिलांच्या कल्याणकारी योजनेसाठी बार कौन्सील ऑफ इंडियाने सर्व राज्य वकिल परिषद व उच्च न्यायालय वकील संघटना, दिल्ली यांनी 2 फेब्रुवारीला बैठक घेतली. त्यामध्ये कल्याणकारी योजना शासनाने राबवाव्यात व तशी तरतूद बजेटमध्ये करावी, असा ठराव पारीत केला आहे. बार काउन्सील ऑफ इंडियाच्या मागण्यांना भुसावळ तालुका वकील संघाने पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात सोमवारी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. तुषार पाटील व सहकार्‍यांनी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याशी चर्चा करीत निवेदन दिले. उपाध्यक्ष धनराज मगर, सचिव आर.टी.पटेल, सहसचिव पुरुषोत्तम पाटील, कोषाध्यक्ष राजेश कोळी, महिला प्रतिनिधी जास्वंदी भंडारी, संजय तेलगोटे हजर होते.