लखनौ: वकील आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा तीस हजारी कोर्टातील वाद देशभरात चर्चेचा विषय राहिला होता. आता वकिलांच्या आपापसातील वादातून लखनौ न्यायालय परिसरात बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. आज गुरूवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात तीन जण जखमी झाले असून, दोन गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहे.
लखनौ न्यायालय परिसरात गुरूवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला. न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाच्या न्यायालयाजवळ घडला. याठिकाणीच लखनौ बार काऊन्सिलचे सहसचिव संजीव लोधी त्याठिकाणी होते. हा हल्ला आपल्यावरच करण्यात आल्याचा दावा लोधी यांनी केला आहे. दरम्यान, घटनेत तीन जण जखमी झाले आहे. त्याचबरोबर दोन गावठी बॉम्ब पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहेत.