वकीलालाच मागितली खंडणी, प्रशांत चौधरींविरुद्ध गुन्हा दाखल

0

भुसावळ– मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यातील पोलीस पथकावर आरोपींनी हल्ला करण्याची घटना ताजी असतानाही सरकारी वकीलाच्याच घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी देत 18 लाखांची खंडणी मागण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. कुविख्यात गुन्हेगार प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकील अ‍ॅड.विजय खडसे यांच्या घरी जात शनिवारी रात्री 11.30 वाजता आरोपीने 18 लाखांच्या खंडणीची मागणी केली, खंडणी दिली नाही तर गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्याची धमकी देण्यात आली. अ‍ॅड.खडसे यांच्या घराच्या कंपाऊंडवरून प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी या युवकाने आत उडी मारत घरात प्रवेश केला. अ‍ॅड. खडसे यांना येत्या दोन दिवसात 18 लाख रूपयांची रक्कम खंडणी म्हणून मागितली. दोन दिवसात जर खंडणीची रक्कम नाही दिली तर गोठी मारून ठार मारण्याची धमकीही दिली. आरोपी पसार झाला आहे.