जळगाव । न्यायालय व वकीली व्यवसायाच्या प्रतिष्ठेसाठी प्रशिक्षित वकील घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी अभिरुप न्यायालया सारख्या स्पर्धा आवश्यक आहेत. आपल्या अशीलाची बाजू मांडतांना न्यायाशी देखील बांधिलकी ठेवा असे आवाहन हायकोर्टाचे न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी शनिवारी केले. मणियार लॉ कॉलेजमध्ये अभिरुप न्यायालय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. डॉ. अण्णासाहेब जी.जी. बेंडाळे स्मृती 12 व्या अभिरुप न्यायालय स्पर्धेचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जळगावचे सत्र न्यायाधिश एम.ए. लव्हेकर, अॅड.एस.एस. फालक, सुनिल चौधरी, प्रमोद पाटील, डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ.विजेता सिंग, प्रकाश पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी के.सी.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश बी. पाटील यांनी भूषविले. यावेळी न्या. के.पी. नांदेडकर, न्या. जे.पी. दरेकर, न्या. एस.के. कुलकर्णी, न्या. एस.एस. घोरपडे, न्या. एस.जे. शिंदे, न्या. ठोंबरे, अॅड. स्वाती निकम, अॅड. सिंचन सरोदे, अॅड. आनंद मुजुमदार, अॅड. सागर चित्रे, अॅड. सत्यजित पाटील आदी उपस्थित होते.
स्पर्धेंतून प्रशिक्षित वकील तयार होतात
यावेळी मार्गदर्शन करतांना न्यायमूर्ती पाटील यांनी न्यायालयीन विलंबाची कारणे स्पष्ट केलीत. तसेच अश्या स्पर्धांमधूनच प्रशिक्षित वकील तयार तयार होतात, असे सांगीतले. सत्र न्यायाधिश लोवेकर यांनी चांगल्या वकीलाच्या अंगी काय गुणवैशिष्टये असावी त्याचा उहापोह केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी न्यायालयीन विलंबावर भाष्य करुन लोकांना न्याय त्वरीत मिळवून देण्यासाठी भावी वकीलांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.सुनिल चौधरी यांनी स्पर्धकांनी युक्तीवादाच्या सादरीकरणाबरोबरच त्यांच्या तयारीला असलेले महत्व स्पष्ट केले. सुत्रसंचलन अपर्वा दलाल,ऋतुजा लाठ यांनी केले.आभार प्रा. डी.आर. पाटील यांनी मानले. यानतंर अभिरुप न्यायालयाच्या स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.