वक्तृत्व स्पर्धेत बोरा महाविद्यालय प्रथम

0

शिरूर । डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप कार्यक्रम अंतर्गत शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ज्युनिअर गटात रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा प्रथम क्रमांक आला तर सिनियर विभागात चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या प्रथम क्रमांक आला. येथील विद्याधाम प्रशालेच्या सभागृहात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत शिरूर पोलीस ठाण्याचा हद्दीतील सात शाळांच्या व तीन महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलीस डीवायएसपी नारायण खानु मोटे यांनी केले.

प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केले. याप्रसंगी विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक धनाजीराव खरमाटे, चंदकांत धापटे, माधव सेनेचे रविंद्र सानप, दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, बाबुराव पाचंगे, मुख्याध्यापिका रमामणी आय्यंगार, शहाजी मिसाळ आदी उपस्थित होते.बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे व प्रा. चंद्रकांत धापटे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण शिरूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीप बारवकर, चांदमल बोरा महाविद्यालयातील प्रा. क्रांती पैठणकर, मुख्याध्यापिका अनिता भोगावडे, पत्रकार प्रा.सतीश धुमाळ यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार पोलीस उपनिरीक्षक भीमगौंडा पाटील यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेले संघ हे उपविभागीय स्तरावर होणा-या स्पर्धेकरीता पात्र झाले आहेत.स्पर्धेच्या सुरवातील मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधान दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन करण्यात आले.