वजन काट्यावर वारंवार होते गफलत; प्रशासनाचे दुर्लक्ष

0

जळगाव । किरकोळ दुकानदारांकडे मापात पाप होते असे अनेकदा पाहण्यात आले. परंतु मोठ्या वजन काट्यात मापात पाप होत असल्याचे समोर आले असून माप व वजन काटे विभागाने अद्याप कारावाई केली नसल्याने प्रशानासनचा वरदहस्त असल्याची शंका उपस्थित होते. मो. अजिज शेख शरीफोद्दीन रा.धुळे यांच्या 6 व 10 चाकी ट्रक आहेत. वाशीहून दाळ घेवून त्यांच्या ट्रक जळगावला दाळ मिलला माल घेवून येत असतात. 15 मे रोजी ट्रक क्र. एमएच 18 एसी 3565 या वाहनातुन 36 टन व 750 कि.लो. उडिद दाळ घेवून सोनल इंडस्ट्रीज मध्ये घेवून आले.त्यांनी मिलमध्ये जाण्यापुर्वी गोविंदराज फेयर स्केल व दुर्गा वेट ब्रिज येथे ट्रकचे वजन केले असता बरोबर भरले. परंतु विजयंत फेअर स्केल ई 6/1 येथे वजन केले असता 1 टन वजन कमी भरले.

याबाबत सहाय्यक निरिक्षक, माप व वजन काटे यांच्याकडे 16 रोजी तक्रार अर्ज दिला. र्दुदैवाने कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे फिर्यादी मो.अजिज शेख याचे म्हणणे आहे. सदर परिसराचा निरीक्षक हा 16 रोजी बाहेरगावी असल्याने तो 17 रोजी आल्या नंतर तपासणी करुन कारवाई करण्यात येईल असे कार्यालयातुन सांगण्यात आले. याबाबत मो.अजिज हेे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता.त्यांना कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगण्यात आले. 17 रोजी माप व वजन तपासणी निरीक्षक येवून तपासणी करतील तो पर्यत पुलाखालून बरेच पाणी वाहुन जाण्याची शक्यता आहे.

जेव्हा मो.अजिज यांच्या वाहनाचे वजन घेण्यात आले व त्यात 1 टन वजन कमी भरले. त्याच्या काही वेळात एक कंटेनर तेथे आले व वजन केले असता.त्यात 750 कि.लो.वजन कमी आढळले . परंतु त्या कंटेनरने दुसर्या ठिकाणी वजन केल्या नंतर वजन बरोबर आढळले असल्याचे मो.अजिज यांचे म्हणणे आहे.

15 दिवसांपुर्वीच वजन काटा पासिंग करण्यात आला आहे. योग्य अधिकार्यांकडून तपासणी होवून दोषी आढळल्यास जो दंड आकारला जाईल तो भरण्यास तयार असेल. असे यावेळी विजयंतफेअरवेल स्केलचे राजेश काबरा यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. दरम्यान, प्रशासनाकडून देखील या महामार्गावरील वजन काट्यांची तपासणी करण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.