पिंपरी-एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) तर्फे पिंपरी चिंचवड शहरा मधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनासोबत वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची गोडी निर्माण करण्याचे कार्य केले. २७ रोजी सिटी प्राईड स्कूल, निगडी, जयवंत भोईर प्राथमिक शाळा भोईरनगर / महाराष्ट्र कल्याण केंद्र, चिंचवड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उद्यान विभाग पिंपरी, निवृत्त शिक्षक संघ, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) च्या एकत्रित उपक्रमातून महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या आवारात व बाहेरील बाजूस ३९ बारतीय वंशाची रोपे लावण्यात आली.
या भागात होणार वृक्षारोपण
पहिल्या टप्प्यात ३९ व दुसऱ्या टप्प्यात ८० झाडांचे रोपण होणार आहे. यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब ,बकुळ, अशोक अश्या प्रकारची झाडे शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी महापालिका उद्यान विभागाची मदत व मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. सिटी प्राईड स्कूल निगडी, जयवंत भोईर प्राथमिक शाळा भोईरनगर शाळेतील विद्यार्थ्यान समवेत इसिए सदस्यांनी वृक्षारोपण केले व पर्यावरणाच्या संवर्धना बाबत प्रबोधन केले.
पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागातून निवृत्त शिक्षकांनी आज हिरीरीने सहभाग नोंदविला. उपस्थित महिलांनी भारतीय प्रथे नुसार मनोभावे वडाची पूजा केली व आज वडाची १० फुट उंचीची पूर्ण वाढ झालेली ९ झाले लावली तर पिंपळाची सुद्धा तेवढ्याच उंचीची ७ झाडे स्वतः लावून घेतली. कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगाराना एक कामगार एक झाड ह्या संकल्पनेत आवारात रोपांचे संवर्धनाचे कार्य सोपवावे अशी सूचना विकास पाटील यांनी प्रसंगी केली.
यांची होती उपस्थिती
सर्व उपस्थित मंडळीने समारंभ पूर्वक पणे कार्यक्रम पार पाडला. प्रसंगी महापालिका मुख्य उद्यान अधीक्षक (उद्यान विभाग) सुरेश साळुंके, प्रकाश गायकवाड, पर्यावरण तज्ञ विकास पाटील ,हिरामण भुजबळ ,डॉ. अभय कुलकर्णी , वंदना सावंत, वंदना कोरपे , कामगार कल्याण चे प्रदीप बोरसे , सुरेश पवार , बाळासाहेब गायकवाड , इसिए तर्फे कामोद नेरकर, प्रभाकर मेरुकर ,मृगेंद्र डमकले , सुभाष चव्हाण , अनघा दिवाकर, विनय मोने, शिकंदर घोडके , गोविंद चितोडकर उपस्थित होते.
वृक्षारोपण झाल्यावर त्याची संवर्धनाची जवाबदारी विकास पाटील यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण संचालकांना घेण्या बाबत विनंती केली .प्रत्येकाने आपल्या घर जवळील झाडाचे संगोपन केल्यास आपले शहर स्वच्छ व सुदर बनेल अशी अपेक्षा बाळगली.