वटपौर्णिमेनिमित्त चिमुकले राम मंदिरासमोर वृक्षारोपण कार्यक्रम

0

जळगाव । पातोन्डेकर ज्वेलर्स, स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठान व देवा तुझा मी सोनार संघटना यांचे संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेनिमित्त चिमुकले राम मंदिर येथे वट वृक्षारोपण व महिला तसेच भाविकांना फ्रुट सलार्ड वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राम मंदिराचे ह.भ.प. दादा महाराज जोशी, आमदार राजुमामा भोळे व जिल्हा पोलिस आधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते सपत्निक वटवृक्षाचे रोपण 56 मोदी ट्री गार्डसह करण्यात आले. सदर रोपाला ठिबक पद्धतीने पाणीपुरवठा केला जाईल असे उत्तम प्रकारच्या ट्री गार्ड देखील सदर संस्थेने बनवून घेतले आहेत.

परिवारातील सदस्यप्रमाणे वृक्षांची घेतली काळजी
याप्रसंगी पातोन्डेकर ज्वेलर्सचे संचालक किरण पातोन्डेकर यांनी सांगितले की महिला ह्या परिवारातील स्री शक्ती असुन जसे आपण आपला परिवार सांभाळतात तसेच एक वृक्ष लावुन त्याचे काही दिवस परिवारातील सदस्या प्रमाणे काळजी घेतली तर वृक्ष वाढीस मोठा वाव मिळेल. आमदार राजुमामांनी पर्यावरण संतुलित राहण्यासाठी वृक्षारोपण हे सर्वोत्तम कार्य असल्याचे सांगितले. तसेच दादा महाराज जोशी यांनी आपल्या आध्यात्मिक भाषेत वृक्षारोपण गरजेचे का? हे उपस्थितांना समजावून सांगितले. सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या आध्यक्षा पुजा पातोन्डेकर, ऊषा सोनार, डिम्पल बिरारी, जया विसपुते, विशाखा पातोन्डेकर यांसह असंख्य महिला उपस्थित होत्या. किरण पातोन्डेकर, उदय पातोन्डेकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.