तळेगाव दाभाडे- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उद्यान विभागाकडून वटपोर्णिमेनिमित्त नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते वटवृक्षाची झाडे लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषदेसमोरील असलेल्या रस्त्यालगत सुमारे 15 फूट उंचीची दहा वटवृक्षाची झाडे लावण्यात आली. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती संध्या भेगडे, माजी सभापती नीता काळोखे, नगरसेविका शोभा भेगडे, मुख्याधिकारी वैभव आवारे, उद्यान विभाग प्रमुख विशाल मिंड, वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य संदीप पानसरे, निलेश गराडे, गणेश निसाळ, नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते.
आठ हजार झाडांचे वृक्षारोपण
नगरपरिषद यावर्षी आठ हजार झाडांचे वृक्षारोपण करणार असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले. तर येत्या पावसाळ्यात शाळा महाविद्यालय,सामाजिक संस्था यांचे सहकार्याने शहर परिसरात ही वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार असल्याचे यावेळी बोलताना नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी सांगितले.