अलिबाग – वडखळ पालवखार तालुका पेण येथील 23 वर्षीय महिलेला पेण आमटेम येथील 22 वर्षीय नराधमाने महिलेचे अपहरण करुन धमकी देऊन शाररीक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर अश्लिल शारीरीक चाळे करीत त्याची व्हिडीओ क्लीप करुन बेआब्रु करण्याची धमकी दिली. नराधम आरोपींनी गेले एप्रिल ते जुलै अशा 4 महिने असे अश्लिल प्रकार केले. फिर्यादी महिला ही पालवखार पेण येथील असून तिची ओळख करुन या नराधमाने तिला अज्ञातस्थळी नेले, तिला ठार मारण्याची धमकी देत शारीरीक अत्याचार व अश्लिल चाळे केले. या महिलेने विरोध केल्यामुळे आरोपींनी शारीरीक अत्याचार व अश्लिल चाळे असल्याची व्हिडीओ क्लीप तयार करुन मागील 4 महिन्यांपासून वारंवार ब्लॅकमेलिंग केले. महिलेने या तरुणाशी सबंध ठेववण्यास नकार दिल्याने व्हिडीओ क्लिप फेसबुक, युट्युब व व्हॉट्स अप वर प्रसिध्द करण्याची धमकी दिली. या प्रकरणी सदर महिलेने वडखळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस निरीक्षक लेंगरे अधिक तपास करीत आहेत.