वडगावलांबे येथे केळीच्या शेताला आग

0

चाळीसगाव । तालुक्यातील वडगांव लांबे गावालगत असलेल्या केळीच्या शेताला आग लागली. आगीत जवळपास 2 हजार केळीची झाडे व ठिबक सिंचनाचे साहित्य जळुन खाक झाले. आगीत एकुण 3 लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी 20 रोजी घडली रविवारी मेहुणबारे पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

वडगाव लांबे येथील शेतकरी विरेंद्रसिंग मानसिंग पाटील (58) यांचे घरामागे शेत आहे. ठिबक सिंचनवर 2 हजार केळी लागवड केली होती. परिवारासह बाहेरगावी गेले असतांना हाताशी आलेल्या केळी पिकाचा नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र अद्याप समजले नाही. तपासी अमलदार हवालदार भालचंद्र पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असुन पुढील तपास करीत आहेत.