वडगावात लांबेत हिंस्त्र श्‍वापदाने पाडला मेंढीचा फडशा

0

हल्ला कोल्हा-लांडग्यांचा मात्र बिबट्या बदनाम
चाळीसगाव – तालुक्यात हिंस्त्र श्‍वापदाकडून पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याचे घटना सुरू असताना या प्रकारात मात्र नरभक्षक बिबट्या बदनाम होत असल्याचे गुरुवारच्या घटनांवरून दिसून आले. तरवाडेजवळ सात बकर्‍यांचा फडशा पाडणार बिबट्याचा असल्याचा समज प्रथम झाला असलातरी हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात या बकर्‍यांचा मृत्यू झाल्याचे वनविभागाने केलेल्या खातरजमानंतर सिद्ध झाले तर तालुक्यातील वडगाव लांबे शिवारातही बिबट्याने हल्ला चढवल्याने मेंढीचा मृत्यू झाल्याची वार्ता कानी पडताच वनविभाग खातरजमा करण्यासाठी पायपीट करीत गुरुवारी दुपारी एकवा जेच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले मात्र प्रत्यक्षात हा हल्ला बिबट्याने नव्हे तर कोल्हा वा लांडगासदृश हिंस्त्र प्राण्याने केल्याचे पाहणीअंती सिद्ध झाले. वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे व मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे आदींनी घटनास्थळी पाहणी करीत मेंढपाळांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या