वडगावात वादळी पावसामुळे घरांची पडझड : 35 हेक्टरवरील केळीचे नुकसान

0

रावेर : वडगाव परीसरात बुधवारी दुपारी आलेल्या वादळी वार्‍यामुळे सुमारे 35 हेक्टरवरील बागांचे नुकसान झाले. वडगावात घरांचे किरकोळ नुकसान झाले असून राज्य महामार्गावर सुध्दा झाडे उन्मळुन पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुनारास विवरे व वडगाव परीसरात अचानक वादळी पावसाला सुरूवात झाली तर 35 हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले. वडगावमध्ये घरांचे किरकोळ नुकसान झाले असून अनेक झाडे उन्मळून पडले आहेत. याची माहिती कळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाहणीसाठी मंडळाधिकारी सचिन पाटील यांना पाठवले. रस्त्यात उन्मळुन पडलेले झाडे बाजूला करण्यासाठी सूचना करण्यात आल्या.