वडगाव-कातवी नगराध्यक्षपदी मयूर ढोरे विजयी

0

वडगाव-कातवी नगरपंचायतचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान मयूर ढोरे यांना मिळाला आहे. त्यांना 4333 मते मिळाली . एकूण सहा उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये वडगाव कातवी नगरविकास समितिच्या मयूर ढोरे यांना बहुमत मिळाले. १६ रोजी नगरपंचायतसाठी मतदान घेण्यात आले होते. आज मतमोजणी झाली.

निवडणूक निर्णायक अधिकारी मावळ मुळशी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे आणि मावळ तालुक्याचे तहसीलदार रणजित देसाई यांनी काम पाहिले. अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.

नगराध्यक्ष पदासाठी मिळालेली मते
मयूर ढोरे – 4333
भास्कर म्हाळसकर – 3423
पंढरीनाथ ढोरे – 3363
मनोज ढोरे – 227
देविदास जाधव – 100
जहीर फैस सोलकर – 37