विवरे- येथून जवळच असलेल्या बर्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्यावरील वडगाव येथील बस स्थानकाजवळ श्रीराम रामकृष्ण धनगर (21 रा.फुलाचे विरोदा, ता.जि.बर्हाणपूर) या तरुणाचा 19 रोजी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी याबाबत निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील व ईश्वर चव्हाण करीत आहेत. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण न कळाल्याने शवविच्छेदन करून व्हिसेरा प्रीझर्व्ह करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच पीएम रीपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण कळणार असल्याचे सांगण्यात आले.