वडगाव बुदूक येथे कुर्‍हाडीने एकाची हत्या

0

अडावद । चोपडा तालुक्यातील वडगाव बुदू्रक येथे शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मरिमातेच्या मंदीराजवळ असलेल्या शिवराज झिपरू भिल याच्या झोपडीजवळ मंगल गायकवाड (भिल) याने गणेश भिल याचा खुन केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीविरोधात अडावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिका माहिती अशी की, दशरथ हसरत भिल (वय-36) रा.वडगाव याच्या घरात घुसून मंगल धनसिंग गायकवाड (भिल) याने दशरथ भिल याच्या पत्नीचा हात धरून तिचेशी अंगलट करण्यास सुरूवात केली. दशरथने त्यास पत्नीपासून दुर केले. याचा राग आल्याने त्याने दोन्ही हाताने दशरथ भिलचा गळा दाबला असता तावडीतून सुटून बाहेर पळाला असता मंगल कुर्‍हाड घेऊन दशरथच्या मागे धावला त्याला चुकवत दशरथ मरिमातेच्या ओट्याआड लपला. यावेळी मरिमातेच्या ओट्यावर बसलेल्या रामदास भिल याने हा कुर्‍हाड घेऊन कुणा मागे धावतो असे बोलला म्हणून मंगलने रामदासवर कुर्‍हाड उगारली. दरम्यान तेथेच मासे पकडण्याचे जाळे विणत बसलेला गणेश सुका भिल (वय-45) हा मंगल भिल यास थांबविण्यास गेला असता त्याने गणेशच्या मानेवर व डोक्यावर कुर्‍हाडने दोन वार केले. गावकर्‍यांनी मंगल भिल यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी गणेश भिल यास प्रा.आ.केंद्रात नेले असता त्यास मृत घोषित करण्यात आले.याबाबत दशरथ भिल याच्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात भादवि कलम 302, 354, 448, 452 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जयपाल हीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गजानन राठोड करीत आहे.